Siddha Niketan
Shri Siddharaj Manik Prabhu Samsdhi mandir at Maniknagar is an incredible Temple.
Datta Loka
Shri Siddharaj Manik Prabhu Samsdhi mandir at Maniknagar is an incredible Temple.
Naubatkhana
Shri Siddharaj Manik Prabhu Samsdhi mandir at Maniknagar is an incredible Temple.
आपल्या जन्मांत आणि दिव्य महापुरुषांच्या आविर्भावांत भेद दिसून येतो. आपण ‘जन्म’ घेतो आणि दैवी पुरुष ‘अवतार’ धारण करतात. मनुष्याच्या जन्मांत आणि दैवी अवतारांत फरक एवढाच कीं मनुष्य आपल्या कर्मानुसार जन्म घेतो आणि ईश्वर स्वेच्छेने शरीर धारण करतो. ‘एखादा मनुष्य विहीरीत पडला’ असे आपण म्हणतो आणि त्याला वाचविण्यासाठी जो विहीरीत उडी मारतो, त्याला आपण ‘पडला’ असे न म्हणता ‘त्याने उडी मारली’ असें म्हणतो. दोघेही विहीरीतच ‘पडले’ पण पहिला आपल्या कर्माने पडला व दूसरा त्यास वाचविण्यासाठी स्वेच्छेने विहीरीत उतरला. अवतार म्हणजे खाली उतरणे. ईश्वर जेंव्हा स्वेच्छेने आपल्या मूलस्वरूपांस आवृत्त करून मर्त्यलोकांत मानव शरीर धारण करतो तेंव्हा त्यांस अवतार असे म्हणतात.
गीतेंत श्रीभगवान् म्हणतात – ‘‘अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्। प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया।।४.६।।’’ मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रकट होत असतो. आपल्यांत आणि ईश्वरांत भेद इतकाच की आपण मायेला वश होऊन जन्म घेतो आणि ईश्वर त्या मायेला आपल्या स्वाधीन ठेऊन अवतार घेत असतो. ईश्वर हा आनंदरूप असून संसाराच्या सुखदु:खाचा त्याच्यावर परिणाम होत नसतो आणि आपण मायेमुळे सतत दु:ख भोगीत असतो. या दु:खापासून निवृत्तीचा एकमेव मार्ग म्हणजे मायेला दूर सारणे होय.